सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र कदम यांना उपनिरीक्षक पदी पदोन्नती…

देवगड
देवगड पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वसंत कदम यांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती प्राप्त झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

.पोलीस उपनिरीक्षक
रवींद्र कदम हे कणकवली तालुक्यातील तिवरे कदमवाडी येथील रहिवासी असून पोलीस प्रशासकीय सेवेत १९९१ साली रुजू होऊन त्यानंतर १९९२ साली मालवण पोलीस स्थानकात पोलीस शिपाई म्हणून ते दाखल झाले त्यानंतर १९९७ साली त्यांची बदली बांदा पोलीस स्थानकात झाली.

त्याठिकाणी पोलीस नाईक पदावर पोहचले त्याठिकाणी ५ वर्षाची सेवा बजावून २००३ साली पोलीस नियंत्रण कक्ष ५ वर्षे व पुढील ५ वर्षे पोलीस मुख्यालय याठिकाणी सेवा बजावली आणि सहा.पोलीस उपनिरीक्षक पदावर पोहचले. त्यानंतर त्यांची बदली देवगड पोलिस स्थानकात झाली व देवगड पोलीस स्थानकात सेवा बजावीत असताना नुकतेच ते पदोन्नतीने पोलीस उपनिरीक्षक देवगड पोलीस स्थानकात सेवा बजावीत आहेत.

You cannot copy content of this page