*मालवण मधील विजयाचे श्रेय भाजप कार्यकर्त्यांना – धोंडी चिंदरकर

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यात पाच ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले असून याचे सारे श्रेय भाजपच्या कार्यकर्त्यांनी आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार, पालकमंत्री, असूनही शिवसेना गावांमधील मूलभूत गरजा पूर्ण करू शकली नाही. शिवसेनेचे लोकप्रतिनिधीनी दिलेली आश्वासने पूर्ण करू शकत नाहीत हे लोकांच्या लक्षात आले म्हणूनच निवडणुकीत मतदार भाजपच्या पाठीशी ठाम राहिला. मालवण तालुक्यात एकसंघ पणे काम करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपला विजय मिळवून देत शिवसेनेला जागा दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर बोलताना दिली . मालवण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालात भाजपने पाच ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले. या विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर हे बोलत होते. यावेळी भाजपचे अशोक सावंत, संतोष कोदे, संतोष गावकर, जेरोन फर्नांडिस आदी व इतर उपस्थित होते. यावेळी धोंडी चिंदरकर म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांनी चांगले काम करत भाजपला घरोघरी पोहचवले. या निवडणुकीसाठी भाजपचे नेते खास. नारायण राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी राज्यमंत्री आम. रवींद्र चव्हाण, आम. नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे आदी नेतेमंडळी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. ज्येष्ठ नेते दत्ता सामंत हे प्रत्यक्ष प्रचारात कार्यरत नसले तरी त्यांचा उमेदवार व कार्यकर्त्यांना पाठिंबा होता. भाजपमध्ये मतांची विभागणी होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न केले. इतरांकडून आमच्या कार्यकर्त्यांना आमिषे दाखवली गेली. मात्र, आमचे कार्यकर्ते प्रामाणिक राहिले. गटबाजी झाली नाही. कार्यकर्त्यांनी चांगले काम करत मालवण राणेंच्या पाठीशी आहे हे कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे, असे धोंडी चिंदरकर म्हणाले. शिवसेनेच्या आमदार, खासदार, पालकमंत्री यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली. मात्र जनतेला आवश्यक असणाऱ्या रस्ता, पाणी, वीज आदी महत्वाच्या मूलभूत गरजा शिवसेना गावागावात पुरवू शकली नाही. त्यामुळे शिवसेनेला ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवणे कठीणच होते. शिवसेना खोटी आश्वासने देते हे लोकांच्या लक्षात आल्याने लोकांनी भाजपला पाठींबा दिला, असेही धोंडी चिंदरकर म्हणाले.

You cannot copy content of this page