जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केला विश्वास*
*💫कणकवली दि.१८-:* शिवसेना आणि महाविकास आघाडीला जिल्हा वासीयांनी जागा दाखवून दिली. सिंधुदुर्गावर सूड उगवणाऱ्या ठाकरे सरकारला मतदारांनी चपराक दिली आहे. आगामी काळात सिंधुदुर्गात तिन्ही आमदार भाजपाचेच असतील. जिल्हा परिषद, पं स वर भाजपाचाच झेंडा फडकेल अशा शब्दांत ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. जिल्ह्यात भाजपला ४५ ग्रामपंचयतींवर भाजपाचा झेंडा फडकला आहे.सावंतवाडी ,कुडाळ आणि कणकवली विधानसभा मतदारसंघात आजी-माजी पालकमंत्री सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी जंग जंग पछाडूनही जनतेने शिवसेनेला नाकारले आहे. भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा नेते नारायण राणे, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा भाजपाचा विजय आहे. गावविकास पॅनेल ही भविष्यात भाजपासोबत येतील असा विश्वास तेली यांनी व्यक्त केला. चिपी विमानतळ चा इलेक्शन इश्यू करणाऱ्या सेनेला जनतेनेच जागा दाखवून दिली अशी टीका तेली यांनी केली.
