सावंतवाडीत नागरिकांना साखर, तिळगुळ वाटप करून भाजप सरकारचा निषेध

विभावरी सुकी यांच्या नेतृत्वाखाली निषेध

*💫सावंतवाडी दि.१८-:* केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस च्या दरात भरमसाठ वाढ केल्याने सामान्य नागरिकांना याचा नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना देखील याचा फटका बसल्याने आज सकाळी ११.३० वाजता गांधी चौक व नगरपरिषद सावंतवाडी जवळील पेट्रोल पंपाजवळ गांधीगिरी मार्गाने पंपावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना व रिक्षा नाक्यावर साखर, तिळगुळ व तीळ लाडू वाटप करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्या विभावरी सुकी यांच्या नेतृत्वाखाली निषेध केला भाजप.सरकारचा निषेध करण्यात आला.सध्याच्या कोविड-१९ च्या कोरोनाच्या काळात आधीच दैनंदिन जीवन मेटाकुटीला आले असताना देखील केंद्र सरकार मात्र गॅस व पेट्रोल या इंधनावरील दर वाढवत असून सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाचे दर कमी असतानाही त्याहून चारपटीने यावर कर आकारून याची विक्री केंद्र सरकार करत आहे. काही वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या राजवटीतील दरापेक्षा आता तीप्पटीने हे दर वाढवून नागरिकांची गळचेपी करण्यात येत आहे. अच्छे दिन सांगून जनतेचा भ्रम निरास केला जात असल्याने या दरवाढीचा निषेध म्हणून आज जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विकास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा साखर, तिळगुळ वाटून गांधीगिरी मार्गाचा अवलंब करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्या विभावरी सुकी यांच्या नेतृत्वाखाली निषेध केला. यावेळी जिल्हा चिटणीस बाळू अंधारी, मालवण कुडाळ विधानसभा काँग्रेस पक्षाचे उमेदवार तथा जिल्हा युवक काँग्रेस प्रवक्ता अरविंद मोंडकर, माजी तालुकाध्यक्ष रविंद्र म्हापसेकर, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, माया चिटणीस, युवक विधानसभा उपाध्यक्षा पल्लवी तारी, संदीप सुखी, चंदन पांगे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नुतन सावंत, गीता सावंत. पेरपेदीन, सरदार ताजर, विधानसभा मिडीया प्रमूख जासमीन लकमेक्षवर, फिझा मकानदार व ऊमेश सावंत. बाळा नमशी,सुधीर मल्हार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

You cannot copy content of this page