*💫कणकवली दि.१८-:* पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार राऊत यांनी माझ्यावर केलेल्या खोट्या टीकेला जनतेनेच प्रत्युत्तर दिले आहे अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली. भाजपाचा कोणीही मोठा नेता ग्रा पं निवडणुकीत सिंधुदुर्गात प्रचाराला उतरले नाहीत. भाजपा कार्यकर्त्यांनी ही निवडणूक कष्टाने जिंकून आणली. याउलट शिवसेनेचे पालकमंत्री, खासदार, आमदार गावागावात जाऊन प्रचार करत होते. मात्र जनतेने भाजपला स्वीकारले. यातूनच सिंधुदुर्गवासीयांच्या मनात भाजपा आहे हे सिद्ध झाले. पारंपरिक शिवसेनेकडे असलेली तोंडवली- बावशी ग्रा.पं. भाजपाकडे आली. कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावात भाजपाची २०० हुन अधिक मते झालीत.हा सेनेचा नैतिक पराभव आहे अशी टीका आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.
*माझ्या वरील खोट्या टिकेला जनतेने प्रतिउत्तर दिले – नितेश राणे
