सुंदररित्या उभ्या राहिलेल्या शाळेचा उपयोग मुलांनी शिक्षणात प्रगती करण्यासाठी करावा

मनीष दळवी:श्री शिवाजी प्रागतिक शाळा नूतन इमारत उद्द्घाटन सोहळा संपन्न

⚡वेंगुर्ले ता.१६-: भावी पिढी शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध होण्यासाठी त्यांना शालेय जीवनात चांगल्या शिक्षणासाठी चांगली सुसज्ज अशी वास्तु महत्त्वाची असते, हे ओळखून वेंगुर्ले कॅम्प येथील ही श्री. शिवाजी प्रागतिक शाळा इमारत सुंदररित्या उभी राहिली आहे, त्याचा लाभ मुलांनी शिक्षणात प्रगती करण्यासाठी करावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.

वेंगुर्ले तालुक्यातील श्री शिवाजी प्रागतिक शाळा, कॅम्प वेंगुर्ले या शाळेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन माजी जि.प. सदस्य तथा शिक्षण सभापती श्री. विष्णुदास उर्फ दादा कुबल यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी अध्यक्ष पदावरून मनिष दळवी बोलत होते. या कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी श्री. रामचंद्र आंगणे, गटारीक्षणाधिकारी श्री. संतोष गोसावी, शिक्षण विस्तार अधिकरी श्रीम. सुनिता भाकरे, केंद्रप्रमुख श्री. महादेव आव्हाड, जिल्हा बँक माजी संचालिका प्रज्ञा परब, माजी नगरसेविका शितल आंगचेकर, माझी विस्तार अधिकारी बाबली वायंगणकर, तसेच शा.व्य. कमिटी अध्यक्ष श्री संतोष जगताप, मुख्या श्रीम. संजीवनी कांडरकर उपस्थित होते.

शाळा व्यवस्थापन समितीतर्फे उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शिक्षणप्रेमी श्री. काळे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी शिक्षण विभाग व दादा कुबल यांचे या इमारतीसाठी मोठे योगदान असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी श्री. दादा कुबल, तसेच विकासक श्री. अखिल आरोसकर यांच्या विषयी गौरवोद्गार काढले. तसेच दोघांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक श्री. सत्यवान पेडणेकर, श्री. भारत आवळे तसेच केंद्रातील बहुसंख्य शिक्षक, पालक, ग्रामस्य, विदयार्थी बहुसंख्येने उपखित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी अध्यक्षा श्री. अशोक आरोलकर, श्री. काळेसर, श्री. बाबली वायंगणकर, श्री महेंद्र घाडी यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. जयराम वायंगणकर तर आभार श्री. बाबली वायंगणकर यांनी मानले.

You cannot copy content of this page