⚡कणकवली ता.१४-: नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ बोर्डवे (सिंधुदुर्ग) या मंडळाची ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार १९ जून २०२२रोजी सकाळी १० वा गिरिजा शंकर सभागृह बोर्डवे या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. सन २०२२-२०२३ चा मागील ताळेबंद वाचन करणे त्यावर चर्चा करून मंजूर करणे.सन २०२२ – २०१३ चे अंदाजपत्रक मंजूर करणे. घटना दुरूस्ती व मंडळाचे नाव बदल करण्यायावत निर्णय घेणे. शाळा व आश्रम यासाठी संस्थेच्या मालकीची इमारत असावी यासाठी जमीन घेऊन इमारत बांधणे, त्रैवार्षिक निवडणूक घेऊन पुढिल तीन वर्षासाठी कार्यकारणीची निवड करणे. याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. या सभेला सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ बोर्डवे अध्यक्ष विठ्ठल गोसावी यांनी केले आहे
