⚡कणकवली ता.१५-: कै . श्रीधर नाईक उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याला पालकमंत्री उदय सामंत यांना आमंत्रित करावे , अशी सूचना मीच नगराध्यक्ष समीर नलावडे यांना केली होती .निदान उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याच्यानिमित्ताने पालकमंत्री सिंधुदुर्गात येतील , असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला .
कणकवली येथे 22 जून रोजी होणाऱ्या कै . श्रीधर नाईक उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावे , ही कार्यकर्त्यांची इच्छा होती . ती गैर नव्हती . मात्र , नारायण राणे हे केंद्रीयमंत्री असून त्यांचे शेड्युल बिझी असते .त्यामुळे ना. नारायण राणे या कार्यक्रमाला येऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.असे आम.नितेश राणे म्हणाले.
