सिंधुदुर्गनगरी ता.०४-:* जिल्हा परिषदेच्या सवतीने सोमवार दि.6 जून 2022 रोजी जिल्हा परिषद येथे सकाळी 9 वाजता शिवस्वराज्य दिन आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिवशक राजदंड स्वराज्यगुढी विधिवत उभारण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आहेत. तरी जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली आहे.
