मालवण ता.०४-:* मालवण येथील श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ आणि श्री संत बाळूमामा कलामंच, मालवण यांच्यातर्फे मामा वरेरकर नाट्यगृह येथे आयोजित राज्य जोडी नृत्य स्पर्धेत नंदिनी हेमंत बिले व विद्या आप्पाजी मादाकाचे (सावंतवाडी) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
स्पर्धेत द्वितीय सोहम राकेश जांभोरे आणि गार्वी दीपक कुबल (सावंतवाडी), तृतीय- जान्हवी तुकाराम ठाकुर आणि मनस्वी श्याम तेंडोलकर (कुडाळ) यांनी क्रमांक प्राप्त केले.
विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, ७०००, ४००० रुपये तसेच चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी पूनम चव्हाण, संजय गावडे, आप्पा लुडबे, दीपक पाटकर, बाबा परब, प्रीतम गावडे, रोहन पेंडुरकर, संभाजी नार्वेकर, दामोदर तोडणकर, अरविंद मोंडकर, अॅड. अमृता मोंडकर, मोहन वराडकर, मनोज मोंडकर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण सुहास वरुणकर व मनस्विनी कुबल यांनी केले. सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले. आभार अॅड. सुमित जाधव यांनी केले.
