तारकर्ली येथील तरुणाची गळफासाने आत्महत्या

मालवण ता.२५-:* मालवण तालुक्यातील तारकर्ली वरचीवाडी महापुरुष मंदिर नजीकच्या घरात यशवंत उर्फ मनोज बुधाजी लोणे (वय ३१) या तरुणाचा मृतदेह आज सकाळी घरातील हॉलमध्ये गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला याप्रकरणी मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, मनोज याने आजाराला कंटाळुन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे याप्रकरणी मृत यशवंत लोणे याचे चुलत भाऊ रुक्मांगत लोणे यांनी मालवण पोलीस स्थानकात खबर दिली आहे. यशवंत लोणे हा तारकर्ली महापुरुष मंदिर नजीकच्या घरात आपल्या वडीलांसह राहत होता.

आज सकाळच्या सत्रात यशवंत याने महापुरुष मंदिर नजीक आपली मावशी मीनाक्षी कोळंबकर यांच्या बंद असलेल्या घरात गेला होता. यशवंत हा दरवाजा उघडत नसल्याची माहिती चुलत भाऊ रुक्मांगत लोणे यांना कळताच घटनास्थळी धाव घेत खिडकीतून पाहिले असता यशवंत हा घरातील हॉल मध्ये वाश्याला गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. रुक्मांगत व त्यांचा पुतण्या विक्रांत लोणे यांनी बंद दरवाजा जोर लावून उघडत पोलिसांना पाचारण केले. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. यशवंत लोणे हा पूर्वी स्कुबा डायविंग व्यवसायात कार्यरत होता. या प्रकरणी मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत.

You cannot copy content of this page