आगामी निवडणुकीत भगवा फडकवा; निरीक्षक चौऊलकर यांचे प्रतिपादन…
आंबोली,ता.२५ शिवसेनेच्या शिव संपर्क अभियान अंतर्गत आंबोलीत बैठक झाली यावेळी समस्या पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या.तसेच अगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवा यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करेल तसेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे अहवाल देण्यात येईल असे या ठिकाणी आलेल्या निरीक्षक तथा स्थानिक लोकाधिकार समिती,सदस्य,महाराष्ट्र राज्य,मुंबई पदाधिकारी संतोष चौऊलकर आणि निलेश राऊत यांनी आंबोली येथे सेनेच्या बैठकीत केले.
आंबोली येथील शिव संपर्क अभियान पदाधिकारी बैठकी साठी पक्ष निरीक्षक म्हणून याठिकाणी स्थानिक लोकाधिकार समितीचे सदस्य संतोष चौऊलकर,निलेश राऊत,तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,सागर नानोस्कर,विभागीय अध्यक्ष बबन गावडे,उत्तम पारधी,विलास गावडे,काशीराम राऊत,जगन्नाथ गावडे,प्रकाश गुरव,मायकल डिसोझा,सुनील नार्वेकर,विशाल बांदेकर, डुबाजी राऊत,हेमंत नार्वेकर,नारायण कोरगावकर,साक्षी राऊत,रोहिणी गुरव,कांता गुरव,दाजी गुरव,पांडू पवार,तानाजी गावडे,अरुण गावडे,अभिजित मेस्त्री,चौकुळ,संजय भिसे,करिश्मा गावडे,अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.यावेळी पदाधिकारी यांनी येथील मतदारसंघातील समस्या कोणत्या विचारल्या यावेळी पदाधिकारी यांनी रोजगाराची प्रमुख समस्या असल्याचे सांगितले.तसेच पर्यटन विकास जो कागदावर असतो तो प्रत्यक्षात नाही.
वैयक्तिक योजना नाहीत.लोकांना हवा तसा विकास होत नाही अशा अनेक समस्या मांडल्या.तसेच पर्यटन विकास अंतर्गत जकात वाडी येथील तलावाच्या कामाची चौकशी ची मागणी केली.तसेच वनखात्या अंतर्गत लोक उपयुक्त अशी कामे होत नाहीत अशा अनेक समस्या मांडल्या.यावेळी पक्षाकडे याचा अहवाल देण्यात येईल सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र काम करावे.पक्ष म्हणून सर्वाचा विचार करण्यात येईल.आणि आगामी निवडणुकीत भगवा झेंडा फडकावा पक्ष वाढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन निरीक्षक चौऊलकर यांनी केले
