*हिंदु जनजागृती समितीआणि सनातन संस्थेच्यावतीन निवेदन
*💫कुडाळ दि.१५-:* प्रजासत्तादिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखणे आणि शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक ध्वज विक्री करणाºयांवर गुन्हे दाखल करणे, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय प्रतिकाविषयी जागृती करणे यासाठी हिंदु जनजागृती समितीआणि सनातन संस्थेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनाला आणि गटशिक्षण अधिकारी, तसेच माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की , राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता, मात्र दुर्दैवाने याचे स्मरण केवळ १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशीच बहुतांश भारतियांना होते. या दिवशी राष्ट्रध्वज मोठ्याअभिमानाने मिरवले जातात. हेच प्लास्टिकचे छोटे छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी सायंकाळपासून रस्त्यावर, कचºयात गटारात आदी ठिकाणी पडलेले आढळतात. प्लास्टिकचे ध्वज तर लगेच नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना पाहावी लागते. राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी हिंद जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. याविषयी सुनावणी करतांना न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले आणि त्यानुसार केंद्रीय आणि राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रकही काढले. यंदा दुकानातून किंवा आॅनलाइनच्या माध्यमातून तिरंगा मास्क विकण्याचा प्रकार आढळून आला आहे. या तिरंगा मास्कमुळे राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. तिरंगा मास्क हे देशप्रेमाचे माध्यम नाही. ध्वजसंहिते नुसार राष्ट्रध्वजाचा असा वापर करणे हा ध्वजाचा अवमानच आहे तसेच राष्ट्रगौरव अपमान निवारण अधिनियम १९७१ चे उल्लंघन आहे. त्यामुळे ‘तिरंगा मास्क’ ची विक्री करणाºयांवर गुन्हे दाखल करावेत, असं निवेदनात म्हटले आहे.
