नगरपंचायत भाजी मार्केट इमारतीच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांना मी एकत्र आणू शकलो : राजन तेली

*💫कणकवली दि.१५-:* नगरपंचायत भाजी मार्केट इमारतीच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांना मी एकत्र आणू शकलो अशी खोचक टीका करतानाच माझ्यावरील ” प्रेम ” असेच ठेवा असा उपरोधिक टोलाही भाजपा जिल्हाध्यक्ष तथा ग्लोबल असोसिइट्स चे भागीदार राजन तेली यांनी कणकवली नगरपंचायत मधील स्वपक्षीय सत्ताधारी आणि विरोधकांनाही लगावला. कणकवली नगरपंचायत च्या आरक्षण क्र २५ मध्ये ग्लोबल असोसिइट्स आणि नगरपंचायत च्या माध्यमातून भाजी मार्केटच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या कराराची मुदत संपली असून वाढीव करार न करताच बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम त्वरित थांबवावे अशी नोटीस कणकवली न पं मुख्याधिकाऱ्यांनी ग्लोबल असोसिइट्स ला काढली आहे. याबाबत बोलताना तेली यांनी सत्ताधारी भाजपाचे असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली काढली आहे.यात सत्ताधारी मंत्र्याचाही हात असल्याचा आरोप तेली यांनी केला.

You cannot copy content of this page