सीईओ प्रजित नायर यांची माहिती
ओरोस ता.२२-:जिल्हा परिषद स्वनिधी, जिल्हा नियोजन निधी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथे ५ ते ८ मे या कालावधीत सिंधू कृषी व पशु-पक्षी प्रदर्शन व सिंधू सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे जिल्हा परिषद कृषी प्रदर्शन आयोजित करू शकली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालक, सुशिक्षित बेरोजगार यांना आधुनिक व विकसित तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, यासाठी हे प्रदर्शन आयोजित केल्याचे यावेळी नायर यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा पशुधन अधिकारी डॉ दिलीप शिंपी, जिल्हा कृषी अधिकारी सुधीर चव्हाण, डॉ विद्यानंद देसाई आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना नायर यांनी, जिल्ह्यातील शेतकरी पशुपालकांना आणि सुशिक्षित बेराजगारांना कृषी व पशुपालनाविषयी आधुनिक तंत्रज्ञान , विकसित यंत्रसामुग्री यांचे ज्ञान मिळावे तसेच जलव्यवस्थापन व यांत्रिकीकरणाचे महत्व कळावे. जिल्हयातील पशुपालक शेतक – यांना विविध प्रकारची आधुनिक कृषी अवजारे , हत्यारे , उपकरणे , बी – बियाणे , प्रगत कृषी तंत्रज्ञान , दुग्धव्यवसायातील आधुनिक यंत्रसामुग्री , विविध उपकरणे , पशु व पक्षांच्या विविध शुध्द देशी , संकरीत व सुधारीत जातींबाबत माहीती मिळावी , प्रत्यक्ष त्या – त्या जातीची जनावरे व कृषी औजारे , उपकरणे पहावयास मिळावी तसेच कृषी व पशुसंवर्धन विभागातील नामवंत तज्ञ अनुभव संपन्न मार्गदर्शकांकडुन आधुनिक प्रगत शेती , संद्रिय शेती , दुग्धव्यवसाय , शेळीपालन व कुक्कुटपालन इत्यादी व्यवसायांबद्दलच्या मार्गदर्शनाद्वारे व्यवसायाच्या संधी शोधणा – या सुशिक्षित बेरोजगारांना कृषी व पशुपालन ( दुग्धव्यवसाय / शेळीपालन / कुक्कुटपालन) व्यवसाय करणेसाठी त्यांचा असलेला आत्मविश्वास वृध्दिंगत होणेस मदत होईल व ते या व्यवसायाकडे वळतील आणि स्वयंरोजगार उपलब्ध होईल यासाठी सर्वांना मार्गदर्शक व उपयुक्त असा ” सिंधु कृषी व पशुपक्षी प्रदर्शन ” या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या महत्वाकांक्षी उपक्रमाचे आयोजन गुरूवार ५ मे २०२२ ते रविवार ८ मे २०२२ या कालावधीत कुडाळ तहसिल कार्यालयानजिकच्या क्रिडा मैदानावर आयोजित करावयाचे निश्चित करण्यात आलेले आहे .
