आम.नितेश राणे यांचा टोला;पालकमंत्र्यांच्या थाटात वावरणाऱ्यांचा पालकमंत्री जाहीर करा
कणकवली ता.२२-:* राज्यातील वीज संकट हे महाविकास आघाडी सरकार निर्मित संकट आहे . काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार येणे म्हणजे लोडशेडींग असे समिकरणच आहे . या वीज संकटामागील प्रमुख कारण म्हणजे महाविकास आघाडीचे धोरण , नियोजनशून्य कारभार यातून जनतेला वेठीस धरण्यात येत आहे . आज प्रत्येक गोष्टीत हे आघाडी सरकार निर्लज्जासारखे केंद्राकडे बोट दाखवत आहे .असा टोला आम.नितेश राणे यांनी लगावला.पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत , विज संकट , बुस्टरडोसचे नियोजन नाही . पालकमंत्र्यांनी राजीनामा देऊन किरण सामंत वा अन्य जे दहा नेते पालकमंत्र्यांच्या थाटात वागतात , त्यांनाच पालकमंत्री म्हणून जाहिर करावे , असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला . कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत आम. नितेश राणे यांनी राज्यातील आघाडी सरकारवर टीकेची झोड उठविली. आम.नितेश राणे म्हणाले,राज्यातील वीज टंचाईचे संकट हे महाविकास आघाडी निर्मित विजटंचाई आहे . राज्य सरकारकडून योग्य नियोजन न झाल्याने आज सर्वसामान्याना लोडशेडींगचा समाना करावा लागत आहे . सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे . येथे जर असे भारनियमन होत असेल तर पर्यटक कसे येणार ? जिल्ह्याला आर्थिक संकटात टाकण्याचे काम हे सरकार करत आहे . पर्यटन जिल्हा म्हणून येथे वेगळे निकष लावा , अशी आपली मागणी आहे , असे सांगतानाच ते म्हणाले,, वीज संकटाबाबत कोळशाचा अभाव असल्याबाबतही केंद्राकडे बोट दाखवतात . मात्र , मार्च ते जून महिन्यात वीजेची मागणी वाढते . त्यासाठी नियोजन केले नाही . राज्य सरकारने याबाबतचे योग्य नियोजन केले असते तर आज हे संकट टळले असते , असेही श्री . राणे म्हणाले . महाविकास आघाडी सरकारने संकट येण्याअगोदर पुर्वतयारी केलेली नाही . कोरोनाच्या बाबतीतही राज्य सरकारने योग्यरित्या न हाताळल्यामुळे राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला . मात्र , या साऱ्याची जबाबदारी केंद्राकडे ढकलण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे .लोडशेडिंगबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उदाहरण पाहिल्यास फिडर प्रमाणे होत असले तरी नियोजन असते,तर वेगळी परिस्थिती असती.महाविकास आघाडीचे सरकार संकटाची पूर्व तयारी करत नाहीत.कोरोनात देखील नियोजन नसल्याने राज्यात धोका निर्माण झाला होता. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे .
येथे अशाप्रकारे विज संकट निर्माण होत असेल हे सरकार जिल्हयाल आर्थिक संकटात टाकत आहे . या साऱ्याची जाणीव पालकमंत्री व इतरांना आहे का ? पर्यटनमंत्री जिल्ह्यात येऊन गेले . पण येथे पर्यटकांना सुविधा , सवलत नाहीत तर पर्यटक कसे थांबणार ? या प्रश्नाचे उत्तर राज्य सरकार , पालकमंत्री यांनी द्यायला हवे . राज्य शासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे वीज टंचाईचे संकट असून मंत्री भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत .
जनतेला अंधारात लोटून स्वतःचे भवितव्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे . राज्य सरकारकडून कोळसा खाण खरेदीबाबतही आम.नितेश राणे म्हणाले , प्रत्येक संकटात संधी साधत भ्रष्टाचार करण्याचे काम हे सरकार करत आहे.सावंतवाडी येथील वीज आंदोलनात पत्रकारांवर गुन्हे दाखल होत असतील तर ही हुकूमशाही आहे का ? पोलीसांच्या माध्यमातून असे होत असेल तर भाजपा म्हणून आम्ही आवाज उठविणार पत्रकारांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्या , अशी मागणीही आम.नितेश राणे यांनी केली . शिवसेनेचा जिल्ह्यातील प्रत्येक नेता स्वतःला पालकमंत्री समजत आहे .
पालकमंत्री जिल्ह्यात येत नसतील तर त्यांनी राजीनामा देऊन इतरांवर जबाबदारी द्यावी . आमदार अमोल मिटकरी पैसे दिल्यावर व्याख्यान देतात . त्यामुळे सांगली येथील कार्यक्राम ते ज्यावेळी बोलले त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते . त्यांनी व इतर नेत्यांनी या वक्तव्याला दाद दिली . म्हणजे ही राष्ट्रवादीची भूमिका होती का ? नंतर माफी मागून काय फायदा ? असा सवालही श्री . राणे यांनी केला .अमोल मिटकरी अधिकृत आमदार आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसची ही भूमिका आहे.त्याच्या मानधनचा चेक कोणी काढला हे पाहायला हवे.,असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
