२८ पासून गावराई येथील साई मंदिराचा वर्धापनदिन सोहळा

सिंधुदुर्गनगरी – प्रतिवर्षाप्रमाणे गावराई- सुकळवाड येथील साई मंदिर १३वा वर्धापन दिन सोहळा 28 ते 30 एप्रिल या कालावधीत भव्य साई पालखी मिरवणूकसह विविध कार्यक्रमांनी संपन्न होत आहे, तरी या वर्धापन दिन कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन साई सेवा समितीचे संस्थापक सल्लागार शेखर वालावलकर यांनी केले आहे.

कसाल मालवण रस्त्यावर गावराई सुकळवाड येथील साई मंदिराचा १३ वा वर्धापन दिन प्रतिवर्षाप्रमाणे २१ एप्रिल पासून साई चरित्र पोथी वाचन पारायण विविध भजन कार्यक्रमाने सुरू झाला आहे ,२८ रोजी ३० एप्रिल या कालावधीत साई मंदिराचा वर्धापन दिन मुख्य सोहळा संपन्न होत आहे. या वेळी सकाळी ७ वाजता साई चरित्र पारायण वाचन समाप्ती, अभिषेक, आरती दुपारी ३ ते ७ साई भव्य पालखी मिरवणूक सायंकाळी ७ वाजता महाआरती ७ ते८.३० खुले रेकॉर्ड डान्स ८.३० वाजता भवानी सिद्ध भराडी बाळ बाल दशावतार नाट्य मंडळ ओसरगाव यांचा नाट्य प्रयोग २९ रोजी सकाळी ९ ते १२ लघुरुद्र होमहवन, दुपारी १२ वाजता आरती ,दुपारी ३ ते ६ सुकळवाड बाजारपेठ येथील टेंबे स्वामी भक्त मंडळाचे वतीने नामस्मरण, सायंकाळी ७ वाजता महाआरती ७.३० ते रात्र ८.३० महापुरुष प्रासादिक भजन मंडळ त्रिंबक बगाड वाडी यांच्या गोप नृत्य, रात्री ९ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा महान पौराणिक नाट्यप्रयोग अष्टांगलक्ष्मी, ३० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी १२.३० वाजता आरती दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी २ ते६ हळदी कुंकू ,४ ते ६ अनिरुद्ध सेवा उपासना मंडळ ओरोस यांचे नामस्मरण ,सायंकाळी ७ वाजता महाआरती आणि दीपोत्सव ७ ते ३० साई दिंडी ,गीत गायन, रात्री९ ते १२.३० दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्य प्रयोग आदी कार्यक्रम संपन्न होत आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोणा महामारी मुळे एकांकिका वर्धापन दिनाच्या निमित्ताने सादर होणारे कार्यक्रम होऊ शकले नाही. यावर्षी आपणा सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात सादर केले जात आहेत तरी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. (-सोबत साईचा फोटो)

You cannot copy content of this page