केळुस उपसरपंच आबा खवणेकर यांचे उपोषण

केळुस कालवीबंदर मोरीच्या दुरुस्तीची मागणी;बांधकामच्या आश्वासनानंतर उपोषण घेतले मागे

सिंधुदुर्गनगरी ता २२ केळूस-कालवीबंदर येथील श्री.देव दाडोबा देवस्थान नजीक असलेली मोरी १२ जुलै २०२० रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे खचून गेली. ही मोरी पूर्णपणे खचून गेल्याने धोकादायक बनलेला रस्ता येत्या पावसाळ्यात वाहून जाऊन कालवी बंदरवाडीचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. वारंवार संबधित सर्व खात्यांकडे पाठपुरावा करूनही त्याची दखल न घेतल्याने केळुस ग्रामपंचायतीचे उपसंरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. वेंगुर्ला तालुक्यातील कालवी तिठा ते कालवीबंदर या रस्त्यावर तळी–बोवलेवाडी जवळ असलेल्या श्री देव दाडोबा देवस्थान लगत असलेली संरक्षिक भिंत १२ जुलै २०२० रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळून पडली आहे. सदर रस्ता कालवीबंदर समुद्र किनाऱ्यावर जात असल्याने मोठया प्रमाणात माणसांची ये-जा असून, मोरी खचल्यामुळे पुढे पडणाऱ्या वादळी पावसात कालवीबंदर वाडीचा संपर्क तुटू शकतो तसेच कालवीबंदर येथे मच्छीमार वस्ती मोठया प्रमाणात आहे. सदर रस्त्यावरुन वेंगुर्ले व कुडाळ वरुन ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्याही मोठया प्रमाणात आहे. तसेच रिक्षा व वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. तर प्रवाशांना व शेतकरी वर्गालाही त्याचा त्रास होत आहे. तसेच पावसाळय़ाच्या कालावधीमध्ये सदर मोरीवर पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने व वाहतुकीला एकच मार्ग आहे. तसेच सध्या या ठिकाणी मोरी जवळील रस्ताही खचत चाललेला आहे. याबाबत २१ जुलै २०२० रोजी जिल्हाधिकारी , जिल्हा परीषद अध्‍यक्ष, कार्यकारी अभियंता यांना याबाबत निवेदने देउन त्यांचे लक्ष वेधले होते. यावेळी तत्कालीन जिल्हा परीषद अध्यक्षा समीधा नाईक यांनी येवून प्रत्यक्ष पाहणी केली होती.

यावेळी बांधकाम खात्याचे अधिकारी सुध्दा उपस्थित होते. कुठल्याहि परीस्थितीत २०२१ मध्ये याठिकाणी रस्त्यावरील पुल (मोरी) व संरक्षण भिंत  बांधण्याचे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले होते. मात्र दीड वर्षे झाले तरी या ठिकाणी शासकीय स्तरावरुन कोणत्याही हालचाली अजून पर्यंत केल्या नाहीत.त्यामुळे येत्या पावसाळय़ात कालवीबंदर वाडीचा संपर्क तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच केळूस कालवीबंदर हा रस्ता जिल्हा परीषद, सिंधुदुर्गच्या मालकीचा आहे. असे असताना याबाबत आजपर्यत पाठपुरावा करूनही त्याकडे जि प प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने आज केळुस ग्रामपंचायतीचे उपसरपंच व पत्रकार कृष्णा उर्फ आबा नारायण खवणेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. *अखेर उपोषण मागे घेण्यात आले-

जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण परुळेकर ,दत्तप्रसाद मिसाळ , यांनी उपोषणस्थळी भेट देत पावसाळ्यापूर्वी या मोरीची दुरुस्ती करण्यात येईल तसेच या आर्थिक वर्षात पुरहानी मध्ये हे काम घेण्यात येईल .असे लेखी आश्वासन दिल्यानंतर केळुस ग्रामपंचायतीचे उपसरपंच व पत्रकार कृष्णा उर्फ आबा नारायण खवणेकर यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी अमित सामंत, बाळ कनियाळकर, भास्कर परब ,रमेश राणे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page