कणकवली २२ एप्रिल (प्रतिनिधी)-१ मे २०२२ रोजी होणाऱ्या कामगार दिनाच औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा औषध कामगार संघटना, सिंधुदुर्ग कडून जिल्ह्यातील औषध दुकानात आणि होलसेलच्या औषध दुकानात २० वर्षे किंवा त्याहून जास्त वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्याचे आयोजित केले आहे,
सदर मेळावा हा कुडाळ येथील रविकमल हॉल नवीन एस टी डेपोजवळ येथे १ मे २०२२ रोजी सकाळी ९:३० वाजता घेण्यात येणार आहे,तरी या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील सर्व औषध कामगार बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान संघटनेचे सचिव अभिजीत गुरव तसेच संघटनेचे अध्यक्ष समीर ठाकुर यांनी केले आहे.
