शेर्ले येथे गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई…

सावंतवाडीतील एक जण ताब्यात: 7 लाख 91 हजार 600 रुपयाचा मुद्देमाल जप्त;

सावंतवाडी ता.२२-:* तालुक्यातील शेर्ले गावच्या हद्दीत गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना सावंतवाडीतील नारायण वेंगुर्लेकर (सावंतवाडी, वैश्यवाडा) याला कोल्हापूर येथील भरारी पथकाने आज सकाळी कारवाई केली असून, वाहनासह 7 लाख 91 हजार 600 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सबंधित इसमाला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक कोल्हापूर विभागाने तालुक्यातील शेर्ले गावात जाऊन केवळ गोवा येथे विक्रीस असलेल्या दारूच्या बाटल्यासह त्या बाटल्यांचा बॉक्स घेऊन वाहतूक करणाऱ्या स्विफ्ट कारवर कारवाई केली असून, 4 लाख 10 हजाराच्या वाहनासह 3 लाख 81 हजार 600 रुपयांची दारू असा एकूण 7लाख 91 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी त्या इस्मला अटक करण्यात आली असून, अधिक तपास राज्य उत्पादन शुल्क, विभागीय कोल्हापूर पथक, कोल्हापूर विभाग करत आहेत.

You cannot copy content of this page