पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी मेळावा
सावंतवाडी ता.२२-:* मळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदा विद्यालय मळगाव या शाळेत उद्या शनिवार २३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता इयत्ता पहिलीत दाखलपात्र बालकांसाठी ‘शाळापूर्व तयारी अभियान पहिला मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.
या अभियानांतर्गत सकाळी १० वाजता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांचे स्वागत, दीपप्रज्वलन आणि उदघाटन, १०.३० वाजता पहिलीला दाखल होणारी मुले आणि त्यांच्या पालकांचो नोंद करणे, सकाळी ११ वाजता इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांची शाळापूर्व तयारी करणे व मार्गदर्शन समुपदेशन आदी कार्यक्रम होणार आहेत. या मेळाव्यास सर्व पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी केले आहे
