मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा मोबाईल हिसकावला मात्र प्रसंगावधानाने प्रयत्न फसला

कणकवली शहरातील धक्कादायक प्रकार

कणकवली 22 एप्रिल (प्रतिनिधी)-कणकवली शहरात फ्लाय ओव्हर ब्रिजवरून मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शहरातील एका महिलेचा मोबाईल दोन तरुणांकडून खेचून घेण्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडला. मात्र महिलेने आरडाओरड करताच ते दोन्ही तरुण पसार झाले.प्रसंगावधान राखत महिलेने मोबाईल थेट पुलावरून खाली फेकला विशेष म्हणजे एवढ्या उंचीवरून मोबाईल खाली पडूनही सुखरूप राहिला हे विशेष.कणकवली शहरात सकाळीच घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हा प्रकार कणकवलीतील फ्लाय ओव्हर ब्रिज वर घडला. दरम्यान त्या महिलेचे फ्लाय ओव्हर ब्रिज जवळीलच असलेल्या एका बिल्डिंगमध्ये घर असल्याने तिने मोबाईल थेट ब्रिज वरून खाली टाकला. मात्र फ्लाय ओव्हर ब्रिज वरून टाकून देखील हा मोबाईल अक्षरशा सहीसलामत राहील्याची माहिती त्या महिलेने दिली. कणकवलीत फ्लाय ओव्हर ब्रिज वर रोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी अनेकांची गर्दी असते.

आज शुक्रवारी सकाळी ती महिला ब्रिजवरून चालत असताना तिच्या मागाहून ॲक्टिवा दुचाकीने आलेल्या दोन तरुणांनी तिच्याजवळ जात गाडी थांबवून काकी माझा मोबाईल बंद पडला आहे. फोन लावायचा आहे तुमचा मोबाईल द्या अशी मागणी केली. मात्र त्या महिलेने नकार देताच त्या दोघातील एका तरुणाने तिच्या सोबत कोणी नाही तिचा मोबाईल खेचून घे असे सोबतच्या दुसऱ्या तरुणाला सांगितले. अशी माहिती त्या महिलेने दिली. या दोघांतील एक हेल्मेटधारी एक विना हेल्मेट परिधान केलेला होता.

दरम्यान त्या महिलेने माझे घर इथे खालीच आहे. मोबाईल खेचला तर मी खाली ओरडून सांगेन असे सांगतात त्या दोघातील एक तरूण त्या महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावून घेण्यास पुढे सरसावला. मात्र मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्या महिलेने चलाखी दाखवत चक्क मोबाईल फ्लाय ओव्हर ब्रीज वरुन खाली टाकला व खाली सर्व्हिस रोडवर असलेल्या एकाला मी या समोरच्या बिल्डींगमध्ये राहते माझा मोबाईल खाली पडला आहे तो घ्या असे सांगितले. यादरम्यान सदर महिलेच्या घराकडून कुणी आले तर आपण पकडले जाऊ या भीतीने हे दोन्ही तरुण जानवली च्या दिशेने वेगाने पळून गेल्याची माहिती त्या महिलेने दिली. ही बाब ब्रिज वर चालणाऱ्या अन्य नागरिकांना समजतात या सर्वांमध्ये घबराट पसरली.

You cannot copy content of this page