पाडलोस-केणीवाडा येथे उद्या विविध कार्यक्रम

सत्यनारायण महापूजेसह जादूचे प्रयोग व दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन

बांदा ता.२२-:* श्री देव राष्ट्रोळी कला क्रिडा मंडळ, पाडलोस-केणीवाडा आयोजित शनिवारी 23 एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी 23 रोजी सकाळी 8 वाजता रांगोळी स्पर्धा, सकाळी 9 वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी 12 वाजता आरती, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 3 वाजता महिलांचा कार्यक्रम, सायंकाळी 4 वाजता संगित खुर्ची, सायंकाळी 6.30 वाजता भजनाचा कार्यक्रम, सायंकाळी 8 वाजता आपा नार्वेकर यांचा जादूचा प्रयोग, रात्री 9 वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ, कवठी यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.

रांगोळी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 1000 रुपये व चषक, व्दितीय 700 व चषक, तृतीय 500 व चषक, संगीत खुर्ची महिलांसाठी प्रथम पारितोषिक 500 रुपये व चषक, संगीत खुर्ची मुलांसाठी 500 रुपये व चषक या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाने केले आहे.

You cannot copy content of this page