काल रात्रीच्या ‘त्या’ प्रकारात विनाकारण पत्रकार विनायक गावस यांचे नाव गोवण्याचा प्रकार…

एफ आय आर मधून नाव वगळा; सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची मागणी…

सावंतवाडी ता.२२-:* महावितरणच्या सावंतवाडी पकेंद्रात शिरून यंत्रचालक आनंद गावडे यांच्या सोबत बाचाबाचीची घटना काल रात्री घडली होती.या घटने विनाकारण विनायक गावस यांचं नाव गोवण्यात आलं आहे. या एफ आय आर मधून पत्रकार विनायक गावस यांचं नाव वगळण्यात याव अशी मागणी आता समाजाच्या सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.

सावंतवाडी तालुका पत्रकार संघानेही विनायक गावस यांचं नाव एफ आय आर मधून मागे घ्याव अशा मागणीच निवदेन पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना दिलंय.

या प्रकरणात विनायक गावस यांचं नाव जाणीव पूर्वक गोवण्यात आलं आहे. निपक्षपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराचा आवाज दाबण्याचा हा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया सर्वच स्तरातून आता उमटू लागल्या आहेत. विनायक सारख्या निर्भीड पत्रकारावर अशा प्रकारचा गुन्हा विनाकारण दाखल होत असेल ते गंभीर असल्याच सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी सांगितले.

माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही जर चुकीच्या पद्धतीने केवळ बातमी दिली म्हणून जर गुन्ह्यात नाव गोवल गेल असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल असं सांगितलं. दरम्यान, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीनेही पत्रकार विनायक गावस यांचं नाव FIR मधून वगळण्यात याव अशा मागणीचं निवदेन सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना देण्यात आलं.

यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण मांजरेकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य हरिश्चंद्र पवार, कोकणसादचे मुख्य संपादक सागर चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव, रामचंद्र कुडाळकर, सिताराम गावडे, भरत केसरकर, प्रसन्न गोंदावळे, रोहन गावडे, विनय वाडकर, आदि पत्रकार उपस्थित होते..

You cannot copy content of this page