डबलबारी भजनांचे आयोजन
देवगड(प्रतिनिधी) तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोंड येथील स्वयंभू श्री देवी भैराई मंदिराचा नवसपूर्तता जीर्णोद्धार वर्धापन दिन रविवार २४ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे,. या निमित्ताने शनिवार २३ एप्रिल रोजी रात्रौ ९ वाजता बुवा समीर कदम (कुडाळ) आणि बुवा संदीप पुजारे (देवगड) तर २४ एप्रिल रोजी बुवा श्रीधर मुणगेकर (मुंबई) आणि बुवा लक्ष्मण गुरव (मुंबई ) यांच्या डबलबारी भजनांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वयंभू श्री देवी भैराई देवस्थान मोंडचे कार्यवाहक सुनील जोशी यांनी केले आहे,
