भाजपला धोबीपछाड देत शिरवल सोसायटी शिवसेनेच्या ताब्यात

कणकवलीत सहकार क्षेत्रात शिवसेनेचा दबदबा सुरूच

कणकवली ता.२१-:* नांदगाव, फोंडाघाट सारख्या मोठ्या सहकारी सोसायट्यांवर भगवा फडकवल्यानंतर शिवसेनेने तालुक्यातील लहान सोसायट्यावरही भगवा फडकवण्याचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. भाजपाकडून अत्यंत नियोजनबद्ध रणनीती आखून देखील त्याला चकवा देत जिल्हा बॅंकेचे संचालक व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली लढविलेल्या कणकवली तालुक्यातील शिरवल सोसायटीमध्ये शिवसेनेने नऊ जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. विजयी उमेदवारांचे शिवसेना नेते सतीश सावंत यांनी शिरवल मध्ये जात अभिनंदन केले. सहकार क्षेत्रात कणकवली तालुक्यात शिवसेना हळूहळू पाय घट्ट रोऊ लागली असून, एकापाठोपाठ विजयाची घोडदौड शिवसेनेने सुरू ठेवली आहे.

विजयोत्सवाच्या तयारीत असलेल्या भाजपाच्या मात्र तयारीवर पाणी फिरले आहे. शिरवल सोसायटी मध्ये शिवसेनाप्रणीत लिंग रवळनाथ शेतकरी विकास पॅनल मधून 11 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते. यामध्ये सुनीता कुडतरकर 61, सुहासिनी यादव 57, रविकांत तांबे 62, दयानंद कोदे 58, चंद्रकांत कुडतरकर 57, भिकाजी सावंत 60, रविकांत सावंत 57, विष्णू ताम्हाणेकर 57, बाळकृष्ण वंजारे 57, हे विजयी झाले भाजपाच्या महेश शिरवलकर यांना 59 मते मिळत एका जागेवर भाजपला समाधान मानावे लागले. या निवडणुकीत भाजप च्या तालुकास्तरावरील पदाधिकाऱ्यांनी देखील लक्ष देऊनही अक्षरशः नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. या सोसायटी वर विजय मिळवताच वागदे उपसरपंच रुपेश आमडोसकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, उपतालुकाप्रमुख राजू राणे, शिवसैनिक संजय पारकर, सुशांत दळवी, हलवलं सरपंच दीपक गुररव, अरुण राणे, सुनील पारकर, मारुती सावंत, शरद सरगले, गणेश राणे, प्रवीण तांबे, भाई पार्सेकर, दत्तात्रय पाटकर, शरद शिरसाट, प्रमोद नानचे, प्रमोद सावंत, प्रशांत कुडतरकर, आदींनी उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांनीदेखील मुंबईवरून दूरध्वनीद्वारे विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page