महाराष्ट्र ब्राम्हण मंडळ सिंधुदुर्गची मागणी...
सावंतवाडी ता.२२-:* इस्लामपूर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीर सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाज आणि पौरोहित्य याबाबत खिल्ली उडवून निंदनीय वक्तव्य केल्याबाबत जाहीर माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र ब्राम्हण मंडळ सिंधुदुर्गच्या वतीने निवेदनाद्वारे नायब तहसीलदार संतोष बांदेकर यांच्याकडे केली आहे.
यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी माफी न मागितल्यास कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी श्री .बाळ पुराणिक ( अध्यक्ष, श्री देव परशुराम मंदिर ट्रस्ट, आजगाव ),सौ अंजली नातू ( तालुका कार्यवाह, महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ, सावंतवाडी),श्री राजाराम चिपळूणकर ( जिल्हाध्यक्ष , म ब्रा मंडळ, सिंधुदुर्ग),शिवानंद भिडे , गुरुदास देवस्थळी , प्रदीप जोशी , प्रकाश सप्ते , नेत्रा मुळ्ये, विद्याधर पाटणकर , चंद्रकांत घाटे , केदार म्हसकर,आदी उपस्थित होते.
