तलावाकाठी सापडले दुचाकी आणि चप्पल; पोलिस घटनास्थळी दाखल
सावंतवाडी ता.२०-:* सावंतवाडी मोती तलावकाठी अज्ञात व्यतीची गाडी आणि चप्पल सापडून आल्याने त्याने आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. यावेळी सकाळी मॉर्निंग वॉक साठी अनेक नागरिक तलावाकाठी फेर फटका मारत असल्याने त्यांनी आत्महत्या केली असे आपण म्हणू शकत नाही. असे मत पोलिसांनी व्यक्त केले असून, त्या व्यक्तीचा शोधा शोध सुरू आहे.
