जिल्हास्तरीय विज्ञान परिषदेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा २८ रोजी गुणगौरव कार्यक्रम

मालवण ता.१९-:* जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभाग व राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान परिषद २०२१- २२ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा व सहभागी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम गुरुवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी १०. ३० वाजता तालुका स्कुल, मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून साने गुरुजी कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख, मालवण गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, मालवण गटशिक्षणाधिकारी संजय माने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी विज्ञान परिषदेत यश मिळविलेल्या राहुल प्रदीप सारंग (पंतवालावलकर ज्युनिअर कॉलेज देवगड), दिव्यालक्ष्मी महेंद्र लाड (एस.एम. हायस्कुल कणकवली), हृषीकेश अर्जुन सानप (शिवाजी इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज), कृती राजेशभाई गोसावी व उर्मिला कमलाकर चव्हाण (भंडारी हायस्कुल मालवण), पूर्वा शिवम परब व भार्गवी आनंद मेस्त्री (भंडारी हायस्कुल मालवण), मंथन दत्ताराम करलकर व कौस्तुभ मनोज हरमलकर (भंडारी हायस्कुल मालवण), तलहा नासिर पाटवेकर व वैष्णवी नंदकिशोर शिरसाट (भरतगड इंग्लिश स्कुल), विक्रम अनिरुद्ध मेहेंदळे (भरतगड इंग्लिश स्कुल), विओला नेवेश फर्नांडिस व दीक्षा बाबू देवगडकर (भरतगड इंग्लिश स्कुल), निनाद दशरथ मुळीक व सुहेल सुभाष नाईक (आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कुल, आरोस), प्रणव गणपत नाईक (खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कुल), पूर्वा संतोष परुळेकर व स्वरा आनंद सावंत (मदर क्वीन इंग्लिश स्कुल), साईश संदीप कांबळी (मदर क्वीन इंग्लिश स्कुल, सावंतवाडी), संघमित्रा मिलिंद पवार व दिशा विजय गावडे (शांतादुर्गा हायस्कुल, वडाचापाट), समर्थ संतोष परब (भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल), स्वानंद विनायक जोशी (एस.एम. हायस्कुल कणकवली) या विद्यार्थ्यांचा गुणगौरव होणार आहे. तरी सहभागी सर्व विद्यार्थी, पालक, मार्गदर्शक शिक्षक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय बालविज्ञान परिषद जिल्हा समन्वयक गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page