सिंधुदुर्ग जैन परिवारामुळे जैन समाज एकत्र प्रा दीपक पाटील

देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात खऱ्या अर्थाने विखुरलेला अल्पसंख्यांक असलेला जैन समाज एकत्र ठेवण्याचे महत्वाचे कार्य सिंधुदुर्ग जैन परिवार यांनी केले आहे.पुरातन काळापासून जैन समाजावर अन्याय होत असताना मी जैन आहे हा अभिमान बाळगून जैन धर्माची संस्कृती भगवान महावीरांचे विचार या जिल्ह्यातील टिकवून ठेवली आहे.

भगवान महावीरांचे सत्य,शांती अहिंसा अपरिग्रह ,त्याग जगा आणि जगू द्या हाच संदेश महत्वाचा ठरत असताना सांस्कृतिक अतिक्रमण रोखून शास्त्राचा पाया असलेला जैन धर्म पुढील पिढीला समजावुन सांगणे महत्वाचे आहे..असे प्रतिपादन प्राध्या.दीपक पाटील यांनी बोर्डवे येथे भगवान महावीर जन्मकल्याण उत्सवात बोलताना केले. सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार यांच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याण उत्सव व वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यात ते बोलत होते.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ .दीपक तुपकर,प्रमुख अतिथी संजय कणेरे,यांचे समवेत जिल्हा अध्यक्ष अनिल खुटाळे,बाळासाहेब डोर्ले,रवींद्र पोकळे,अशोक ठोबरे, महावीर मांगले,राजाराम दंताळ,दिपराज बीजितकर दयानंद मांगले,सौ शैलजा डोर्ले,सौ पद्मा दंताळ, सौआशा खुटाळे,सौ दीपिका बिजितकर,सौ संगीता तुपकर उपस्थित होते. : मान्यवरांचे स्वागत प्रास्तविक सल्लागार बाळासाहेब डोर्ले यांनी केले.पाहुण्यांचा परिचय सौ संगीता तुपकर,सुत्रसंचलन सौ दीपिका बिजीतकर यांनी करून उपस्थित पाहुणे व समाजातील गुणवंत समाज बांधव भगिनी यांचा सत्कार मान्यवर पाहुण्यांचे हस्ते शाल श्रीफळ गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.

सकाळच्या सत्रात भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव,पूजा,अभिषेक,आरती प्रसाद इत्यादी धार्मिक विधी पार पडले. या पुढे बोलताना प्राध्या. श्री पाटील म्हणाले,आपल्या जैन धर्माचा अभिमान बाळगा त्याबरोबरच या पुढील युग हे सरस्वतीचे असून आपल्या युवकांना सरस्वतीचे कार्या पर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रांत जैन युवकाने अत्युच्य पदावर पोहचणे महत्वाचे असून बिझनेश एज्युकेशनही आवश्यक आहे.संसारात एकमेकांना समजून घेतले तर संसार यशस्वी होतो.त्यासाठी धर्माशी नाते अधिक महत्वाचे आहे .असेही आवर्जून सांगितले. आपल्या अध्यक्षीय समारोप भाषणात डॉ दीपक तुपकर यांनी आजच्या काळात मुलींचे सक्षमीकरण महत्वाचे आहे त्याचबरोबर,स्मार्ट गर्ल,करिअर गाईडन्स,आरोग्य विषयक,तसेच रोजगार विषयी माहिती समजून घेणे आवश्यक आहे.असे आवर्जून सांगितले. आभार सौ .संगीता तुपकर यांनी मानले.दुपारच्या सत्रात महिला व मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

You cannot copy content of this page