मालवण शहर महिला भाजपा अध्यक्षा सौ.अन्वेशा आचरेकर यांची माहिती
मालवण ता.०७-:* केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहर महिला भाजपाच्या वतीने दि. १० एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते सायंकाळी ६ यावेळेत मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे महिलांसाठी मच्छिवर आधारित सी फूड पाककला स्पर्धा तसेच फनी गेम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मालवण शहर महिला भाजपा अध्यक्षा सौ.अन्वेशा आचरेकर यांनी दिली.
मालवण शहर महिला भाजपाच्या वतीने प्रथमच महिलांसाठी मच्छिवर आधारित सी फूड पाककला स्पर्धा तसेच फनी गेम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेतील प्रथम विजेत्या तीन महिला स्पर्धकांना आकर्षक मानाची पैठणी देण्यात येणार आहे. ही स्पर्धा महिला वर्गासाठी खुली असून या स्पर्धेसाठी वयाचे बंधन नाही. या स्पर्धेसाठी प्रथम येणाऱ्या २५ महिला स्पर्धकांचा स्पर्धेसाठी विचार केला जाईल. स्पर्धेत मच्छिवर आधारित बनविलेले पदार्थ आवश्यक असून स्पर्धकांनी स्वतः घरातून बनविलेला खाद्यपदार्थ स्पर्धा स्थळी आणावा.
स्पर्धेसाठी बनविलेल्या पदार्थासाठी वापरलेले साहित्य तसेच पाककृती स्पर्धकांनी लिहून आणून परीक्षकांना त्याची माहिती देणे स्पर्धकावर बंधनकारक राहील. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. या पाककला स्पर्धेबरोबरच महिलांसाठी फनी गेम्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, यातील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जातील. या दोन्ही स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी आपली नावे दि. ९ एप्रिल पर्यत अन्वेशा आचरेकर (मोबा क्रमांक ९४०४३४४३२२ ) बाळू मालवणकर ( मोबा क्रमांक ९४२३८८०९९१) मालवण शहर भाजप कार्यालय मामा वरेरकर नाट्यगृह मालवण समोर येथे संपर्क करून नोंदवावीत. या स्पर्धेत महिला वर्गाने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप महिला मालवण शहराध्यक्ष सौ. अन्वेशा अजित आचरेकर यांनी केले आहे.
