गवंडीवाडा येथील श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सव

मालवण ता.०७-:* मालवण गवंडीवाडा येथील श्री राम मंदिरात दि. १० एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त दि. १० रोजी सकाळी ११ वाजता श्री बाळ कासरलकर यांचे सुश्राव्य कीर्तन, दु. १२.३० वा. श्रीराम जन्म, दुपारी १ वा. महाप्रसाद, रात्री ९ वा. खेळ पैठणीचा ही स्पर्धा होणार आहे.

यासाठी रोहित परुळेकर – ९४२१२६८६१६ व आराध्या गवंडी – ९४०५८०५८५० यांच्याकडे नावनोंदणी करावी. दि. १३ एप्रिल रोजी रात्री १० वा. रेकॉर्ड डान्स सादर होणार असून इच्छुकांनी आपली नावे दिनेश वराडकर -९०४९०८११८१ यांच्याकडे द्यावीत. तर दि. १६ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी होणार असून सकाळी ६ वा. हनुमान जन्म, रात्री १० वा. श्री समर्थ रामदास प्रासादिक नाट्यमंडळ, राम मंदिर गवंडीवाडा यांचे ‘स्वामी’ हे नाटक सादर होणार आहे. तरी भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page