उपक्रमशील शिक्षक जयसिंगराव वाघमोडे महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

सावंतवाडी ता.०७-:* तालुक्यांतील डेगवे हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक जयसिंगराव सखाराम वाघमोडे यांना ‘महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक’ पुरस्कार नुकताच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने जयसिंगराव वाघमोडे यांना नुकतेच सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून आमदार रमेश पाटील, मुंबई उच्च न्यायालयाचे ॲड. चेतन पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे-परब तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राणे सचिव गजानन नानचे यांच्या हस्ते जयसिंगराव वाघमोडे यांना जिल्हास्तरीय मेळाव्यात गौरविण्यात आले.

श्री.वाघमोडे हे सामाजिक शैक्षणिक एक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेत शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्री.वाघमोडे यांच्या यशाबद्दल धी बांदा नवभारत शिक्षण संस्थेचे चेअरमन तसेच सर्व संस्था पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी सावंत, शालेय समिती सदस्य भ.स.देसाई यांनी संस्थेच्या वतीने श्री. वाघमोडे यांचा सत्कार करीत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्री.वाघमोडे यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page