दर्पण प्रबोधिनीचा जयभिम महोत्सव १० एप्रिल रोजी कणकवलीत होणार

भीमराव पांचाळे उद्घाटक तर रोशन पाटील मार्गदर्शक तसेच गायकांचा शाहिरी जलसा

कणकवली ता.०७-:* सामाजिक परिवर्तन आणि सम्यक समाज प्रबोधन या उद्देशाने फुले -आंबेडकरी विचारधारा प्रमाण मानून उत्तम पवार यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या युवकांची कृतिशील आणि विचारशील क्रांतीचक्र असलेली दर्पण प्रबोधिनी ही सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात जिल्ह्यात अग्रगण्य असलेली संस्था गेली अनेक वर्षे विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत आहे, दरवर्षी उत्तम पवार यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हास्तरीय जयभिम गायन पार्टी स्पर्धा आयोजित केली जाते, यावर्षी संस्थेच्या वार्षिक महोत्सवानिमित्त उत्तम पवार यांच्या जन्मस्मरण दिनाचे औचित्य साधून ९ एप्रिल रोजी बुद्धविहार कणकवली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

तसेच १० एप्रिल रोजी जयभिम महोत्सव -२०२२ चे आयोजन बुद्धविहार कणकवली पटांगण येथे करण्यात येत आहे, सायंकाळी ६ ते ७ या वेळेत दर्पण महिला फ्रंट प्रस्तुत क्रांतिकारी गीतांचा आणि सांगितीक नृत्यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७ ते ८ वा. जयभिम महोत्सवाचे उद्घाटन होणार असून सुप्रसिध्द गझलनवाज़ भीमराव पांचाळे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत, आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून ओबीसी संघर्ष समिती महाराष्ट्राचे प्रवक्ते, सत्यशोधक युवा प्रबोधनकार रोशन पाटील यांचे आंबेडकरी चळवळीच्या प्रबोधनाची पुढील वाटचाल या विषयावर क्रांतिकारी मार्गदर्शन लाभणार आहे.

स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य सिद्धार्थ तांबे असणार आहेत. यावेळी प्रमुख मानवंत म्हणून अनिल शामराव तांबे, डी. के.पडेलकर,सुरेश कदम, भास्कर तांबे, संदीप कदम, रवींद्र पवार, डी. बी. कदम, राजेंद्र कदम, मोहन जाधव, अनिल जाधव उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे सल्लागार प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, प्रा. डॉ. सोमनाथ कदम, डॉ. व्हि. जी. कदम, नितीन कल्याण कदम, डॉ. अशोक कदम, डॉ. सिद्धार्थ तांबे, श्रीधर तांबे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रात्री महाराष्ट्रातील नामवंत गायक, कलाकारांचा भिम शाहिरी जलसा, भिम जल्लोष -२०२२ हा बुद्ध -भीम गीतांचा, नृत्यांचा आणि मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करण्यात येणार असून या भिम जल्लोषात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कुणाल मेश्राम, सारेगम फेम प्रीतम बावडेकर, स्टार प्रवाह छोटा उत्साद फेम पृथ्वी तांबे, नामवंत गायक दिनेश हेलोडे, सिद्धार्थ कदम, सुदीन तांबे, स्मिता कदम आणि सोबत दर्पण परिवारातील कलावंत तसेच संगीत संयोजन प्रथमेश पेडणेकर, सुभाष कदम यांच्या सह ईशिका डान्स ग्रुपचा बहारदार नृत्याविष्कार सादर होणार आहे. तरी परिवर्तनवादी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी, कला रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजेश कदम, प्रमुख कार्यवाह आनंद तांबे ,महिला फ्रंटच्या स्नेहल सुनिल तांबे, स्टुडंट फेडरेशनचे विशाल कासले आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख किशोर कदम यांनी केले आहे.

You cannot copy content of this page