केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजगाव येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी ता.०७-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजगाव येथे दादा चषक क्रिकेट स्पर्धेचे भाजप कडून आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मुंबई, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयकॉन खेळाडू खेळणार असून, या सामन्याचा थरार 9 व 10 एप्रिल ला पहायला मिळणार आहे. ही स्पर्धा माजगाव येथील कुंभारवाडा येथील मैदानात आयोजित करण्यात आली असून, रसिकांनी सामने पाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन माजगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे भाजप विभागीय अध्यक्ष सचिन बिर्जे यांनी केले आहे.

ही स्पर्धा जिल्हा परिषद माजी अध्यक्षा रेश्मा सावंत, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, अजय सावंत, नेमळे सरपंच विनोद राऊळ, बाळा वेजरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.

You cannot copy content of this page