सावंतवाडी नगरपालिका अर्थसंकल्प जाहिर का करत नाही…?

माजी नगरसेवक राजू बेग यांचा सवाल

सावंतवाडी ता.३१-: सावंतवाडी नगरपालिका 2022-2023 अर्थसंकल्प का जाहीर करत नाही असा सवाल माजी नगरसेवक राजू बेग यांनी उपस्थित केला आहे. मालवण नगरपालिकेचा अर्थसंकल्प काहीच दिवसांपूर्वी जाहीर झाला असताना देखील सावंतवाडी नगरपालिकेचा अर्थ संकल्प जाहीर होण्यासाठी उशीर का असा प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबतची प्रतिक्रिया त्यांनी ग्लोबल महाराष्ट्र चॅनेलची संपर्क साधून दिली आहे.

यावेळी ते बोलताना म्हणाले की मालवण चा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सावंतवाडीचा देखील अर्थसंकल्प जाहीर होणे अपेक्षित होते मात्र अद्याप देखील अर्थ संकल्प जाहीर न झाल्याने आपण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. मात्र त्यांच्याकडून देखील उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून, तसेच अर्थसंकल्प 22-23 आज जनतेला देखील समजणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना म्हणाले.

You cannot copy content of this page