अस्सल मालवणी क्रिएशन व्दितीय तर कार्टी कणकवलीची तृतीय
कणकवली ता.३१-:* कै.सुरेश अनंत धडाम स्मृति महापुरुष मित्रमंडळ बाजारपेठ कणकवली आयोजित झेंडा चौकातील मांडावर महापुरुष मित्रमंडळाने आयोजित केलेल्या हास्यकल्लोळ स्पर्धेत कलांकुर ग्रुप, मालवण संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. अस्सल मालवणी,अस्सल मालवणी क्रिएशन,कणकवली संघाने व्दितीय ,कार्टी कणकवलीची या संघाने तृतीय क्रमांक पटकविला.तर उत्तेजनार्थ सिंधुरत्न, मालवण यांना मिळाला.या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांनी विविध विषयावर भाष्य करीत रसिकांचे मनोरंजन व समाजप्रबोधनही केले.
या हास्यकल्लोळ स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला होता. या संघांनी विविध विषयांवर सोंगे सादर करून रसिक प्रेक्षकांना खखळून हसवले.तर माडयाचीवाडी कुडाळ संघाने विविध अंगानी वेशभूषा साकारून मनोरंजन करत स्पर्धेत रंगत आणली.त्यानंतर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक शरद पारकर, बाळा सापळे, दिलीप पारकर,नाथा अंधारी, चंदू सावंत,अनिल मुंज,महापुरुष मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी, उपाध्यक्ष राजू पारकर, खजिनदार मंदार सापळे, उद्योजक नीलेश धडाम, राजेश सापळे, विलास कोरगावकर, राजू मानकर,उदय मुंज, दिनेश नार्वेकर, हर्षल अंधारी,हरीश उचले,विकास काणेकर,प्रद्युम मुंज, सोहम वाळके, प्रज्वल वर्दम, चेतन अंधारी,दत्ता तोरस्कर,यश अंधारी, वृषभ मेंनकुदळे, वृद्र सापळे, संदीप अंधारी, आकाश बिडये, आदी उपस्थित होते. या स्पर्धेतील विजेत्या कलांकुर ग्रुप मालवण संघाला 10000 रु. व चषक व सन्मानपत्र, द्वितीय क्रमांक अस्सल मालवणी क्रिएशन संघ 8000 रु. चषक व प्रशस्तीपत्रक देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.या स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रा.हरिभाऊ भिसे,सुहास वरुणकर,अभय खडपकर यांनी काम पहिले.त्याचा मंडळाच्या वतीने सनामचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.तर सूत्रसंचालन व आभार बाळू वालावलकर यांनी मानले.रात्रौ १० वा प्रा.हरिभाऊ भिसे विलास खानोलकर,श्रीरंग पाचंगे यांच्यासह ३० कलाकाराच्या संचात रंगखांब प्रस्तुत,’मांडावरील जल्लोष’ हा कॉमेडी कार्यक्रम सादर झाला याला हि रसिकानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
