महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सचिव शशांक बावचकर यांचे कणकवलीत केले स्वागत

कणकवली 31 मार्च (प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सचिव तथा इचलकरंजी नगरपरिषद नगरसेवक शशांक मल्हारराव बावचकर हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणी करिता कणकवली येथे दाखल झाले होते.

याप्रसंगी आप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी त्यांचे सोबत सोशल मीडिया प्रमुख ओंकार आवळकर, विराज पाटील, सुर्यकांत देशमुख उपस्थित होते

यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस महेन्द्र सावंत, तालुकाध्यक्ष मांजरेकर, तालुका उपाध्यक्ष निलेश नारायण मालंडकर, सचिन राणे,जिल्हा सांस्कृतिक विभागीय अध्यक्ष प्रविण वरुणकर,प्रदिप पांगम उपस्थित होते

You cannot copy content of this page