खारेपाटण ग्रा.पं.च्यावतीने कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन

कणकवली ता.३१-:* कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीच्यावतीने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावातील सर्व नागरिकांना नेहमीच्या घरगुती वापरत येणाऱ्या विविध वस्तूंचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटण येथे ११ ते १३ एप्रिल २०२२ या कालावधीत करण्यात आले असल्याची माहिती खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी दिली.

खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटण येथे आयोजित करण्यात आलेल्या या मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणात दि.१३ एप्रिल २०२२ रोजी निरमा पावडर बनविणे,निळ बनविणे,लिक्विड बनविणे,साबण बनविणे,फिनेल बनविणे आदी नेहमीच्या घरगुती वापरात येणाऱ्या वस्तूंचे मोफत प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शकाकडून देण्यात येणार आहे. तर धूप बनविणे,कापुर बनविणे,अगरबत्ती बनविणे,अत्तर बनविणे.यांचे देखील मोफत प्रशिक्षण महिला व पुरुषांना या प्रशिक्षण वर्गात देण्यात येणार आहे.

सलग तीन दिवस चालणाऱ्या या मोफत प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी प्रशिक्षणार्थींना आपली नावे ८ एप्रिल २०२२ पर्यंत ग्रामपंचायत कार्यलयात प्रशिक्षण मागणी अर्ज भरून नोंदववीत. व जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गाच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.असे आवाहन ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटण यांच्यावतीने ग्रामविकास अधिकारी जि. सी. वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page