उन्हाळी शाळेची वेळ बदलावी

उन्हाची तीव्रता प्रखर असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होण्याची शक्यता :;प्राथमिक शिक्षक भारती संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली मागणी

ओरोस ता.३१-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळा उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने सध्या सकाळी ७.२० ते ११.३० या वेळात भरत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या मार्चच्या आदेशानुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्राथमिक शाळांची वेळ सकाळी ७.१० ते १२.३० अशी बदलली आहे. ही बदललेली वेळ विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक दृष्टिने गैरसोयीचे आहे. त्यामुळे ती बदलावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक भारती संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे केली आहे.

विधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश शाळा डोंगराळ भागात आहेत. विद्यार्थी ३ ते ४ किमी अंतर पायपीट करून शाळेत येतात अशा परिस्थितीत विद्यार्थी सकाळी ७.१० वाजता शाळेत पोहोचणे अशक्य आहे. तसेच दुपारी १.३० नंतर घरी जाताना कडक उन्हामुळे विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. तसेच निर्जन पायवाटेने दुपारच्या वेळी घरी जाताना जीवितास धोका संभवू शकतो, अशी समस्या संघटनेने नायर यांच्या लक्षात आणून दिली आहे.

कोविडच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहपासून दूरअसल्याने आ ७.१० ते दुपारी १२.३० पर्यंत विद्यार्थी मानसिकदृष्ट्या शाळेमध्ये अध्ययन करू शकण्यास समर्थ नाहीत. तसेच जिल्ह्यातील बहुतांशी शाळांमध्ये धान्य पुरवठा झाला नसल्याने शालेय पोषण आहार सुरु झाला नसल्याने विद्यार्थी उपाशीपोटी अध्ययन करू शकणार नाहीत.

२०२१-२२शैक्षणिक वर्ष १५ जून पासून सुरू झालेले आहे त्यावेळी निर्गमित केलेल्याआदेशामध्ये शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण,गृहभेटी तसेच वाड्या वस्त्यांवर जाऊन अध्यापन सुरु ठेऊन नियोजित अभ्यासक्रम पूर्ण केलेला असल्याने जादा वेळ शाळा पेण्याची आवश्यकता वाटत नाही. म्हणून सिंधुदुर्ग जिन्ह्यातील प्राथमिक शाळांची वेळ पूर्वीप्रमाणे ७.२० ते ११.३० करावी अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने आग्रही मागणी मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांची भेट घेवून केली आहे. चौकट तसेच समग्र शिक्षा अनुदान २०२१-२२ पीएफएमएस प्रणालीद्वारे खर्च होण्यास अडचणी निर्माण होत असल्याने खर्च करण्यास मुदतवाढ मिळावी,अशी मागणी करण्यात आली आहे,अशी माहिती जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली.

यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, जिल्हा महिला सचिव श्रीमती वैशाली गर्कल, जिल्हा प्रतिनिधी लहू पाटील, सिद्धार्थ नेरूरकर,मालवण तालुकाध्यक्ष संतोष कोचरेकर, दोडामार्ग सचिव सखाराम झोरे, नागेश जाधव, सागर कुराडे, विकास कपाटे उपस्थित होते.

You cannot copy content of this page