नांदगाव केंद्रशाळा नंबर १ नजिक घडला अपघात
कणकवली ता.२६-:* मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव केंद्रशाळा नंबर १ नजिकच्या ओहाळ दरम्यान काल सायंकाळी ७.३० च्या दरम्यान दुचाकीच्या धडकेत पादचारीचा सुर्यकांत शांताराम बिडये रा.नांदगाव (बिडयेवाडी) वय ४९ यांचा मृत्यू झाला आहे .
सदर अपघात एवढा गंभीर होता की,सदर पादचारी याला धडकून दुचाकीस्वार बाजूला असलेल्या ओहाळात जावून पडला यामुळे दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे.तर पादचारी सुर्यकांत शांताराम बिडये रा.नांदगाव (बिडयेवाडी) यांना गंभीर दुखापत झाल्याने तातडीने कणकवली येथे नेण्यात आले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ओरोस येथे हलविण्यात आले होते.ओरोस येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.त्यांच्या अपघाती मृत्यूने नांदगाव परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली असा परिवार आहे.
