मोफत ई-श्रम कार्ड आणि युनिव्हर्सल पास शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

अर्चना घारे-परब यांची संकल्पना; राष्ट्रवादीचा उपक्रम

सावंतवाडी ता.२६-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि सावंतवाडी विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या संकल्पनेतून शहरातील नागरिकांसाठी मोफत ई श्रम कार्ड आणि मोफत युनिव्हर्सल पास ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा सावंतवाडीतील हजारो नागरिकांनी लाभ घेतला असून, उद्या या शिबिराचा शेवटचा दिवस असून, ज्या नागरिकांनी अजूनही लाभ घेतला नसेल त्यानी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page