कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरून लढाई करणारा लढवय्या नेता

लोकप्रिय नेता आ वैभव नाईक यांच्यावर वाढदिनी होतोय शुभेच्छांचा वर्षाव

सिंधुदुर्ग दि.२६-:* लढाई स्वतःची असो वा पक्षाची कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरून लढाई लढणारा, प्रंसंगी कार्यकर्त्यांसह स्वतः मार खाणारा , पोलिसांच्या केसेस स्वतःवर घेणारा असा जिल्ह्यातील राजकारणातील नेता म्हणजे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल महाराष्ट्र ने घेतलेला हा धावता आढावा…

काहींना आमदारकी ही वारसा हक्काने मिळते, तर काहींना पक्ष श्रेष्ठींच्या आशीर्वादाने मिळते, तर काहींना आमदारकी संघर्षातून मिळते. आमदार वैभव नाईक यांना मिळालेली आमदारकी ही संघर्षातून मिळालेली आहे. २५ वर्ष रक्तरंजित संघर्ष केल्यानंतर त्यांना आमदारकी मिळाली आहे. २००८ साली आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जिल्हाप्रमुख पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर लगेचच लागलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आमदारकीचे तिकीट देण्यात आले. आणि पक्षांनी दिलेली ही जबाबदारी स्वीकारण्या पलीकडे त्यांच्यासमोर काहीच पर्याय नव्हता. नारायण राणे सारख्या नेत्याला त्याच्याच बालेकिल्ल्यात जाऊन आव्हान देणे सोपे नव्हते. परंतु, अशावेळी देखील आमदार वैभव नाईक त्यांच्या विरोधात उभे राहिले. यावेळी त्यांच्यावर दोनवेळा जीवघेणा हल्ला करण्यात आला.

परंतु, केवळ दैव बलवत्तर म्हणून ते यातून बालबाल बचावले. राजकारण हे त्यांचे कधीच उदर निर्वाहाचे साधनं नव्हते. त्यांनी क्रशर व्यवसायात चांगल्या पैकी जाम बसवत सेटल झाले होते. परंतु, तरीही त्यांनी राजकीय संघर्ष स्वीकारला. २०१४ साली जिल्ह्यात राणे विरोधात लाट आली असे अनेक विरोधक म्हणतात खरे, परंतु, त्याची सुरुवात आमदार वैभव नाईक यांनी २००९ सालीच सुरुवात केली होती. अनेक वेळा विरोधकांनी आमने सामने चे दिलेले आव्हान स्वीकारून ते स्वतः या लढाईत रस्त्यावर उतरून प्रसंगी मार देखील खाल्ला आहे. अनेकजण आमने सामने च्या लढाईचे आव्हान देऊन स्वतः लपून बसतात आणि कार्यकर्त्यांना पुढे करतात, परंतु, आमदार वैभव नाईक हे कार्यकर्त्यांच्या समोर उभे राहतात म्हणून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख जिल्ह्यात निर्माण केली आहे. आणि म्हणूनच ते आमदार म्हणून तब्बल दोनवेळा निवडून देखील आले आहेत. अशा धडाडीच्या आणि संघर्षमय जीवन जगत असलेल्या आमदार वैभव नाईक यांना ग्लोबल महाराष्ट्र कडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

You cannot copy content of this page