प्रेक्षकांनी लाभ घेण्याचे माऊली क्रिएशनचे आवाहन
दोडामार्ग ता.२५-:* येथून जवळच असलेल्या इब्रामपूर गावात प्रथमच माऊली क्रिएशन व कला संस्कृती संचालनालय गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला संगीत महोत्सव २७ मार्च रोजी साजरा होत आहे.ही एक पर्वणी आहे.प्रेक्षकांना संगीत प्रेमी यांना मेजवानी आहे.या संगीत महोत्सव याचा लाभ घ्यावा असे आवाहन माऊली क्रिएशन अध्यक्ष दिपक शिरोडकर, निकिता नामदेव शिरोडकर, वैशाली गवस, निकिता दिपक शिरोडकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मान्यवर मंडळी यांच्या हस्ते हे उद्घाटन केले जाणार आहे असे सांगितले. २७ मार्च रोजी इब्रामपूर गावात प्रथमच साजरा होणारा संगीत महोत्सव हा गावाला पर्वणी आहे.
सरकारी प्राथमिक शाळा येथे होणाऱ्या या पहिल्या संगीत महोत्सव उद्घाटन पेडणे मतदार संघाचे आमदार प्रविण आर्लेकर, यांच्या हस्ते तर प्रमुख अतिथी म्हणून मिलिंद माटे संचालक संस्कृती विभाग, जेष्ठ रंगकर्मी दिगंबर परब, भंडारी समाज अध्यक्ष शिवकुमार आरोलकर, इब्रामपूर सरपंच सोनाली परवार,धारगळ सरपंच भुषण नाईक, साहित्यिक दयाराम पाडलोसकर, प्राध्यापक सुभाष सावंत, उपस्थित राहणार आहेत. यावेळी वासुदेव जाधव यांचे सनई वादन, चार वाजता संगिताचा कार्यक्रम,सिध्देश पवार,विष्णू गवस, कृष्णा कोटकर, नितेश सावंत यांचे शास्त्रीय गायन, अनंत कांदोळकर यांचे बासरी वादन, अर्पिता शिरोडकर यांचे कथक नृत्य, निलेश पेडणेकर मनिष तांबोळकर,आकाश साळगावकर यांचे पखवाज वाद्य,सादर होणार आहे. राञी साडेआठ वाजता मुग्धा भट सामंत,पुणे यांचा साथसंगत बहारदार कार्यक्रम होणार आहे.तरी रसिकांनी मोठ्या संख्येने या संगीत महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन दिपक शिरोडकर निकिता शिरोडकर, वैशाली गवस यांनी केले.
