शिमग्यातील निधी दिला जेष्ठांला औषधांसाठी

तारकर्ली येथील बालगोपाळाचा आदर्श उपक्रम

मालवण ता.२५-:* तारकर्ली गावातील बाळगोपाळांनी प्रतिवर्षांप्रमाणे या वर्षीही समाजासमोर एक नवा आदर्श प्रस्थापित करत होळी सणादरम्यान गावात शिमगा खेळुन निधी गोळा केला व या गोळा झालेल्या निधी मधील काही भाग गावातील श्री. विनायक कांदळगावकर या ज्येष्ठ व्यक्तीला औषधोपचारासाठी मदत म्हणून दिला आहे.

तारकर्ली गावातील रोहन नरेश कांदळगावकर, यज्ञेश वंदन केरकर, वेदांत सदाशिव सागवेकर , ईशान सदाशीव सागवेकर , प्रणित भार्गव कांदळगावकर, निनाद गणपत मोंडकर, रिषभ श्रीधर खराडे, आशिष जितेंद्र चव्हाण , सिद्धेश नरेश टिकम,नैतिक धोंडी कांदळगावकर, रोहित बाळकृष्ण वरक व रामचंद्र चंद्रशेखर कुबल या बाळगोपाळांनी होळी सणा दरम्यान गावात शिमगा खेळुन निधी गोळा केला.

या गोळा झालेल्या निधी मधील काही भाग गावातील विनायक कांदळगावकर या ज्येष्ठ आणि आजारी व्यक्तीला औषधोपचारासाठी मदत म्हणुन दिला. त्यामुळे या कुटुंबावर असलेला वैद्यकीय खर्चाचा भार काही प्रमाणात हलका झाला आहे. या उपक्रमाचे हे सलग चौथ वर्ष आहे. यापुर्वी सुद्धा या बाळगोपाळांनी गावातील अनेक कुटुंबाना आर्थिक मदत केली होती. हे बाळगोपाळ आपल्या नकळत्या वयात सुद्धा अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित असल्याने सध्या तारकर्ली पंचक्रोशीत ते कौतुकाचा विषय ठरत आहेत.

You cannot copy content of this page