बांदा दि.२५-:* सातोसे रेल्वे ट्रॅकवर कुजलेल्या अवस्थेत मिळालेला मृतदेह हा सातोसे देऊळवाडी येथील नामदेव जयराम मसुरकर (वय 65) यांचा आहे. मृतदेहा शेजारी मिळालेल्या कागदपत्रावरून ओळख पटण्यास मदत झाली. रेल्वेची धडक बसून मसुरकर यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव काळे, हवालदार चंद्रशेखर मुंगेकर, सिद्धार्थ माळकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह बांदा आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत.
