रूपेश राऊळ; पक्षात कमी झालेलं स्थान टिकवण्यासाठी संजू परबांची धडपड
सावंतवाडी ता.२०-: ७२० दिवसात शहरातील एक खड्डा देखील बुजवू न शकणारे संजू परब हे स्वतःच टामटूम असून, या दिवसात त्यांनी काय दिवे लावले ते सावंतवाडीतील जनतेला माहित आहेत. अशा शब्दात रुपेश राऊळ यांनी संजू परब यांची खिल्ली उडवली आहे. निवडणुकीत दिलेल्या वचना पैकी संजू परब एकही वचन पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे कोण टामटूम आहे हे सगळ्या जनतेला समजले असल्याचा टोला देखील लगावला आहे.
