माजी जी.प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांचे प्रतिपादन
दोडामार्ग,दि.१६.-: गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात विरोधी पक्ष म्हणून काम करत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ते कृषी व सभापती पदाची जबाबदारी दिली त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष ठरला.आपल्याला मिळालेल्या सभापती पदाचा वापर हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी बांधव यांच्यासाठी करु शकलो.कोट्यावधी रूपये खर्च हा विविध विकासकामांचे शेतकरी यांना साहित्य देऊ शकलो असे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसेच कृषी व पशुसंवर्धन सभापती राजेंद्र म्हापसेकर यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सर्वधन विभाग यांची शेवटची सभा बुधवारी दोडामार्ग येथे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
