प्रमोद सावंत होळीनंतर घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेत घेतली भेट

गोवा दि.१६-:गोव्याचे काळजीवाहू-मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मणिपूरचे काळजीवाहू-मुख्यमंत्री एन बिरेन सिंग तसेच गोवा भाजपचे नेते आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी संसदेत दाखल झाले होते. गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून ते होळीनंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती ट्वीटरद्वारे सांगितली.

You cannot copy content of this page