महिला दिनानिमित्त कार्यक्रमांना साकेडीत उस्फूर्त प्रतिसाद

कवयित्री सुप्रिया प्रभू मिराशी, तलाठी योजना सापळे यांचे मार्गदर्शन

कणकवली ता.१३-:* महिला दिनाचे औचित्य साधून साकेडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच रिना राणे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या महिला दिनाच्या विविध उपक्रमांना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यात प्रामुख्याने गावातील महिलांनी सादर केलेली गाणी तसेच हिरीरीने भाग घेत सादर केलेले फनी गेम्स सर्वांच्याच पसंतीस उतरले.

महिला दिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक व कवयित्री सुप्रिया प्रभू मीराशी यांनी महिलांना दिलेल्या टिप्स या महिलांसाठी येत्या काळात निश्चितच उपयुक्त अशा ठरतील अशा विश्वास यावेळी महिलांकडून व्यक्त करण्यात आला. ग्रामपंचायत येथे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलादिनी दरवर्षी काही ना काही उपक्रम राबवत साकेडी सरपंच रीना राणे यांनी एक वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्याचा उपक्रम हाती घेतला.

या वर्षीच्या महिला दिनाच्या कार्यक्रमांमध्ये खास करून सर्वच महिलांनी नऊवारी परिधान केल्याने एक मराठमोळा व पारंपरिक लूक या कार्यक्रमात दिसून येत होता. यावेळी ज्येष्ठ कवयित्री सुप्रिया प्रभु मिराशी, सरपंच रीना राणे, उपसरपंच महंमद जहूर शेख, तलाठी योजना सापळे, माजी सरपंच सुरेश साटम, डॉ. दीक्षा वाघमारे, पुष्पा वाळके, योगिता गोसावी, माजी सरपंच सुलभा साटम, प्रिया जाधव, ग्रामपंचायत सदस्य विशाखा राणे, किशोरी तेली, आनंदी परब, आदिती राणे, फराना शेख, ग्रामसेवक संजय तांबे यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सर्व माजी ग्रामपंचायत सदस्य व माजी महिला सरपंच याचा सत्कार करण्यात आला. यावेळी तलाठी योजना सापळे यांनी देखील महिलांना मार्गदर्शन करत महिलांनी सर्वच क्षेत्रांत धडाडीने काम केले पाहिजे असे आवाहन केले. तर सुप्रिया प्रभू मिराशी यांनी मार्गदर्शना सोबत आपल्या कविता देखील सादर करत उपस्थितांकडून दाद मिळवली.

You cannot copy content of this page